टागोर वाचनालयाच्या बांधकामाचा शुभारंभ

येथील महानगरपालिकेच्या गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालय इमारतीचा पहिला मजला अभ्यास केंद्रासाठी इमारत बांधणे या कामाचा शुभारंभ आम. प्रकाश आवाडे यांच्या हस्ते व डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिकेच्या गुरूवर्य रविंद्रनाथ टागोर वाचनालयाच्या इमारती बांधकामासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, चंद्रशेखर शहा, राजू बोंद्रे, दीपक सुर्वे, चंद्रकांत पाटील, सतीश मुळीक, नरसिंह पारीख, किशोर पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.