हौसेखातर उचलले पाऊल! ४५ लाखांच्या….

अलीकडच्या काळात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खिलार जातीच्या बैलांच्या संगोपनात व खरेदीत वाढ होऊ लागली आहे. अनेक कार्यक्रम तसेच वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातात. डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील यांनी देशिंग येथे आयोजित केलेल्या रुस्तम-ए- हिंद बैलगाडा शर्यतीत हिंदकेसरी सुंदऱ्याने प्रथम क्रमांक पटकावून राज्यातील बैलगाडा शर्यत शौकिनांचे लक्ष वेधून घेतले होते.

खानापूर करंजे येथील शेतकरी व गलाई व्यावसायिक शरद माने यांनी बेळंकीतील प्रसिद्ध अशा हिंदकेसरी सुंदऱ्या या बैलाला तब्बल ४५ लाखाला खरेदी केले आहे. या सुंदऱ्या बैलाने बैलगाडा शर्यतीत अवघ्या महाराष्ट्रात आपल्या नावाचा दबदबा केला आहे. पळशी, हिवरे, खानापूर येथील बैलांनी महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा शरद माने, करंजे गाजवल्या आहेत. त्यामुळे खिलार जातीच्या बैलांच्या संगोपनात व खरेदीत वाढ होऊ लागली आहे. करंजे येथील शरद मानेंनी ४५ लाखांना हा हिंदकेसरी सुंदऱ्या बैल विकत घेतला.


मला व माझ्या मुलाला बैलगाडी शर्यतीचा नाद आहे. खिलार जातीचा उत्तम असा बैल आपल्याकडे असावा, अशी आमची इच्छा होती म्हणून हा नामवंत असा हिंदकेसरी सुंदऱ्या आम्ही खरेदी केला आहे. असे शरद माने यांनी सांगितले.