नागेवाडी म्हणजे नागनाथ नगरचे सुपुत्र आणि ओबीसी समाजाचे राज्यनेते संग्राम नाना माने यांना वंचित बहुजन आघाडी कडून एक मोठी ऑफर आलेली होती. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी संग्राम नाना माने यांना पुणे येथील आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात अलर्ट केलेले आहे. त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आलेला आहे.
त्यानुसार ओबीसी नेते संग्राम नाना माने यांच्या वंचितच्या प्रवेशासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झालेल्या आहेत. आमदारकी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संग्राम नाना माने वंचितच्या वाटेवर असून लवकरच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थित संग्राम नानांचा वंचितमध्ये प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.
संग्राम नाना माने यांनी देखील आगामी विधानसभा निवडणुकीची लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर मतदारसंघातील राजकारण ढवळून निघणार आहे.