राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सुशांत देवकर यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना जाहीर पाठिंबा दिला. याबाबतची घोषणा त्यांनी विटा येथे पत्रकार परिषदेत केली. देवकर हे २०१७-१८ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खानापूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. सध्या ते महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटात सक्रिय होते.
सुशांत देवकर म्हणाले, स्वर्गीय अनिल बाबर यांच्यासोबत मी १६ वर्षे राजकीय प्रवास केला. त्यांच्या पश्चात मी सुहास बाबर कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून त्यांना पाठिंबा देत आहे. यावेळी तानाजीराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, अॅड. सुमित गायकवाड, महेश कदम, फिरोज शेख, विश्वजित देवकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.