इचलकरंजी शहर कामगार वस्तीचे आहे. अल्प दरात चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने तत्कालिन लोकप्रतिनिधींनी शहराच्या विविध भागात प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य केंद्रांची उभारणी केली. परंतु महापालिकेच्या उत्पन्नाच्या आर्थिक मर्यादा यामुळे या आरोग्य केंद्राकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. परंतु आता आ. आवाडे यांनी या केंद्रांच्या नुतनीकरणासाठी पुढाकार घेतल्यामुळे गोरगरीब जनतेला दिलासा मिळणार आहे.
इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून याठिकाणी देशभरातील विविध राज्यातून अनेक कुटुंबे उदरनिर्वाहाच्या निमि ताने स्थायिक झाली आहेत. हे शहर काम गारांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. त्याम ुळे कामगार आणि झोपडपट्टीवासियांची संया मोठी आहे. या सर्वांना ज्या त्या ठिकाणी आवश्यक त्या आरोग्य सेवा- सुविधा मिळाव्यात यासाठी शहरात सहा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले आहेत.
त्यामध्ये लालबहाद्दुर शास्त्री शाळा क्रं. ३४ कलानगर, भारतमाता विद्या मंदिर शाळा क’. ३३ शाहु पुतळा, हुतात्मा भगतसिंग शाळा क’ २२ विक’म नगर, झाकीर हुसेन उर्दु शाळा खंजिरे मळा, वेणुताई विद्या मंदिर हॉल आंबेडकरनगर आणि म्युन्सिपल हॉल जवाहरनगर पोस्ट ऑफिसजवळ यांचा समावेश आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतून ज्या त्या भागातील नागरिकांना आरोग्य सेवा, औषधोपचार केले जातात. ही प्राथमिक केंद्रे अत्यंत जुनी आहेत. केंद्र सुरु असलेल्या इमारतींची अवस्था जीर्ण झाली असलेने या केंद्रांच्या नुतनीकरणाची गरज होती.
या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी माहिती घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींच्या नुतनीकरणासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु केला होता. कामगारांचे शहर व औद्योगिकनगरीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्यासह छोटे-छोटे अपघात घडत असलेने तातडीने आरोग्य सुविधांची सातत्याने नितांत गरज भासते. त्यासाठी आवश्यक सुविधांसह आरोग्य केंद्राच्या इम भारती सुसज्ज असणे आवश्यक असल्याबद्दल सविस्तर माहिती आमदार आवाडे यांनी दिली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळवून शहरातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नुतनीकरणासाठी ५९ लाखचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून लवकरच या आरोग्य केंद्रांचे रुपडे पालटून त्याठिकाणी आवश्यक सुविधाही उपलब्ध होण्यासासाठी आमदार आवाडे प्रयत्नशील आहेत.
भागात असलेल्या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नुतनीकरणासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून हा निधी मंजूर झाला असून यातून प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपडे पालटणार आहे.
