विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील वातावरण तापले

सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू झालेली आहे. प्रत्येक मतदारसंघात सभा, मेळावे यांचे आयोजन केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इचलकरंजी मतदार संघात देखील इच्छुकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. मदन कारंडे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून यंदाची निवडणूक जिंकण्यासाठी लढवायची, अशा अर्थाने कामाला आरंभ केला आहे.

विशेषतः त्यांच्या या कार्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची ताकद मिळत चालल्याचे जाणवत आहे.
चंदगड आणि कागलबरोबर इचलकरंजीची जागा लढविण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसने बनविला आहे.

डॉ. नंदाताई बाभुळकर, मदन कारंडे या दोन्ही नेत्यांना राष्ट्रवादीचे बळ निवडणूक लढविण्याच्या दृष्टीकोनातून आणि वेगळ्या ‘अर्था’ची ताकद दिली जात असल्याची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. पुढच्या दोन आठवड्यात कारंडे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.