तांदुळवाडी कुंडलवाडी (ता. वाळवा) पासून अडीच किमी अंतरावर वारणा नदीपासून अर्ध्या किमीवर दर्गा आहे. हा परिसर धार्मिकस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे लोकांची वर्दळ जास्त प्रमाणात तिथे असते. येथे पाण्याचे जास्त प्रमाणात आहे.
वारणा नदीकाठी असलेल्या घोडंपीर बाबा दर्यापासून थोड्याच अंतरावर भक्ष्याच्या शोधात मगर पहुडल्याचे अनेक ग्रामस्थांनी पाहिले आहे. येथील शेतामध्ये मोठा असा खड्डा आहे. तेथे मगरीचे वास्तव्य आहे. सोमवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान ती सूर्याच्या किरणाला मोकळ्या जागेत भक्ष्याच्या शोधात पहुडल्याचे अनेक ग्रामस्थांनी तसेच दर्शनास आलेल्या भाविकांनी पाहिले आहे.