वाळवा तालुक्यातील ढवळी येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार जयंत पाटील यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. इस्लामपूर आपला खरा शत्रू जातीयवादी भाजपा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, एन. डी. पाटील यांनी आयुष्यभर जातीयवादी विचारांच्या विरोधात लढा दिला. आता कोणी तरी येईल, जुन्या घटना-प्रसंग उकरून काढेल, त्यांना थारा देऊ नका.
पुन्हा कणखर, स्वाभिमानी आणि पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा, असे आवाहन खासदार शरद पवार यांच्या भगिनी सरोजमाई पाटील यांनी केले. सरोजमाई पाटील म्हणाल्या, कोणत्याही परिस्थितीत ढवळी येथे जास्त मताधिक्य मिळायला हवे. दिवंगत एन. डी. पाटील व जयंत पाटील त्याचा कोणी बाऊ करण्याची गरज नाही. जयंत पाटील म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, दिवंगत एन. डी. पाटील यांनी आयुष्यभर पुरोगामी विचार जोपासला आहे. हाच विचारांचा वारसा घेऊन आम्ही राज्यात राजकारण करीत आहोत. आम्हांस सहकार्य करावे अशी भावना मतदारांपुढे व्यक्त केली.
महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव म्हणाल्या, आमच्या भगिनी लाडक्या बहिणी पंधराशे रुपयाला फसणार नाहीत. तिची सुरक्षितता, रोजगार आणि शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी आपण काय केले? असाही सवाल करत आम्ही जयंत पाटील यांच्या समवेत राहणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
यावेळी युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, अॅड. एन. आर. पाटील, दिवंगत एन. डी. पाटील यांचे चिरंजीव प्रशांत पाटील, स्नुषा संगीता पाटील, नेर्लेचे सरपंच संजय पाटील, बँकेचे संचालक सुरेश पाटील, लालासाहेब पाटील, सरपंच सुजित पाटील, उपसरपंच आनंदराव पाटील, शंकरराव पाटील यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या
भाजपच्या अपप्रचाराला
बळी पडू नका
भाजपाच्या पिलावळीकडून जाणीवपूर्वक आपल्या राज्याला बदनाम आणि दुर्बल करण्याचा डाव खेळला जात आहे. ते तुमची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या कसल्याही आमिषाला आणि अपप्रचाराला तुम्ही बळी पडू नका, असे आवाहन सरोजमाई पाटील यांनी केले.