मुंबई लोकलमध्ये फुल्ल राडा, पाहा VIDEO

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये दररोज लाखो प्रवासी सोबत प्रवास करतात. त्यामुळे साहजिकच या गर्दीत कोणाची ना कोणाची बाचाबाची होत असते. कधीकधी प्रकरण हाणामारीपर्यंत देखील पोहचते. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून ट्रेनमधील भांडणाचा आणखी एक व्हिडीओ आता समोर आला आहे.

व्हायरल झालेल्या  व्हिडीओत दोन प्रवासी धावत्या लोकलच्या दरवाज्यात उभे राहून प्रवास करताना दिसून येत आहे. यादरम्यान दोघांमध्ये अचानक बाचाबाची होते. वाद इतका विकोपाला जातो, की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची कॉलर पकडतो आणि त्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतो.

हा संपूर्ण प्रकार पाहून इतर प्रवासी आरडाओरड करतात. अरे, वेडा आहेस का… आत या… असं म्हणत प्रवासी दोघांनाही दरवाज्यापासून बाजूला होण्याची विनंती करतात. यानंतर हे दोघेही प्रवासी आतमध्ये येतात आणि परत त्यांच्यात वाद सुरू होतो. काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ पाहून अनेकांना धडकली भरली आहे. काहींनी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी यावर संताप देखील व्यक्त केला आहे. एकाने कमेंट करताना लिहलंय, की लोकल ट्रेनमध्ये हे रोजचेच झाले आहे. दुसर्‍याने तर दुसऱ्याने छोट्याश्या गोष्टीवरून तुम्ही एकमेकांना माराल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ मुंबई Matters या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. दरम्यान, मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सुद्धा अशी प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. अलीकडेच, ट्रेनमध्ये दोन महिला एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.