पंढरपूरच्या विठ्ठलाचं चरणस्पर्श दर्शन आजपासून पुढील दीड महिन्यांसाठी बंद करण्यात आलं आहे. विठ्ठलाच्या मंदिर गाभाऱ्याचं काम करण्यासाठी मंदिर प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या काळात भाविकांना रोज सकाळी ५ ते ११ वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन घेता येणार आहे. यामुळे १५ मार्चपासून विठूरायाचं चरणस्पर्श दर्शन पुढील किमान दीड महिन्यासाठी पूर्णपणे बंद झालंय.
विठूरायाचं चरणदर्शन दर्शन आजपासून बंद…..
