IPL  2024 : धोनी म्हणजे विजयाची गॅरंटी…..

दरम्यान, 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. धोनीचा सीएसके आणि विराट कोहलीचा आरसीबी यांच्यामध्ये सलामीचा सामना चेन्नईच्या मैदानात रंगणार आहे. आयपीएलच्या रनसंग्रामाला अवघ्या आठ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलाय. कॅप्टन कूल एमएस धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. 2008 पासून एमएस धोनी आयपीएलमध्ये नेतृत्व करतोय.

धोनी खेळत असलेला संघ हमखास प्लेऑफमध्ये जातोच. धोनीचं नेतृत्व म्हणजे विजयाची गॅरंटी होय. धोनीच्या विजयाची टक्केवारी 60.38 इतकी भन्नाट राहिली आहे. आतापर्यंत एकाही कर्णधाराची विजयाची टक्केवारी इतकी नाही. धोनीने आयपीएलमध्ये 212 सामन्यात नेतृत्व केलेय, त्यामध्ये 128 विजय मिळालेत तर 82 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय.

हिटमॅन रोहित शर्मा आयपीएलमधील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 158 सामने खेळले आहेत, त्यामध्ये 87 विजय मिळालेत तर 67 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. रोहित शर्मानं 55.06 टक्के सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांनी कर्णधार असताना प्रत्येकी पाच पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरले आहे. धोनी, रोहित, विराट अन् गौतम गंभीर यांच्यानंतर डेविड वॉर्नरचा क्रमांक लागतो. डेविड वॉर्नरनं कर्णधार असताना 35 सामन्यात विजय मिळवलाय तर 30 सामन्यात पराभवाचा सामना केलाय. डेविड वॉर्नरची विजयाची टक्केवारी 52.24 इतकी आहे.

शेन वॉटसनने आयपीएलमध्ये  कर्णधार म्हणून 52 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 30 विजयांव्यतिरिक्त 24 पराभव झाले आहेत. शेन वॉटसनची विजयाची टक्केवारी 54.55 इतकी राहिली आहे. वीरेंद्र सेहवागने कर्णधार म्हणून 28 सामने जिंकले, तर 24 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 51 सामने खेळले, त्यापैकी 30 जिंकले, परंतु 21 सामने गमावले.  मास्टर ब्लास्टरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 58.82 टक्के सामन्यांमध्ये यश मिळाले.