इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय राज्यात प्रथम!

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रुग्णालयांची गुणवत्ता आणि दर्जा उंचाविण्याकरता राज्य शासनाने ‘कायाकल्प’ उपक्रम राबविला. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील १३४ रुग्णालयाचे मूल्यांकन झाले. या सर्व रुग्णालयांत उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूरने बाजी मारत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तर उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ, ग्रामीण रुग्णालय तासगाव, चिंचणीवांगी व शिराळा या रुग्णालयांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे.

इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाला राज्यस्तरीय कायकल्प पुरस्काराप्रित्यर्थ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार म्हणून सुमारे २० लाख रुपये व प्रशस्तीपत्र तर उत्तेजनार्थ विजेत्या रुग्णालयांना सुमारे एक लाख रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे