इचलकरंजी मतदार संघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असणारे, कोट्यवधींच्या निधीतून विविध विकासकामे मार्गी लावणारे, सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेऊन कार्यरत असणारे, लोकांशी सातत्याने संपर्कात असणारे नेतृत्व म्हणून रविंद्र माने यांच्याकडे पाहिले जाते.
इचलकरंजी राजकीय क्षेत्रातील स्वतेजाने तळपता सूर्य म्हणजे शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख रविंद्र माने होय. पंचवीस वर्षे सामाजिक क्षेत्रातील योगदानाने एक लोकप्रिय नेता म्हणून त्यांची इचलकरंजीनगरीला ओळख आहे.
लढवय्या नगरसेवक म्हणून त्यांनी स्वतःला अनेकदा सिद्ध केले आहे.त्यांनी इचलकरंजीसाठी राज्य व केंद्रातून भरघोस निधी खेचुन आणला व इचलकरंजीच्या विकासकामांना वेगाने चालना दिली. इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक शासकीय धोरणांची अमंलबजावणी केली.