पुढच्या आठवड्यात इंडियन प्रीमियर लीगचा नवीन सीजन सुरु होईल. आयपीएलच पूर्ण शेड्यूल अजूनपर्यंत आलेलं नाहीय. बीसीसीआयने फक्त 21 मॅचच्या शेड्यूलची घोषणा केली आहे. याच कारण आहे, या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका. आता बातमी अशी आहे की, बीसीसीआय आयपीएलचा दुसरा हाफ भारताबाहेर यूएईमध्ये आयोजित करेल. TOI ने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. बीसीसीआयचे काही वरिष्ठ अधिकारी सध्या UAE मध्ये आहेत. आयपीएलचे उर्वरित सामने भारताबाहेर आयोजित करण्याचा विचार सुरु आहे.निवडणूक आयोग शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या . त्यानंतर आयपीएलच्या उर्वरित शेड्यूलमधील सामन्याबाबत घोषणा होईल.
आयपीएल (IPL 2024) परदेशात नेले जाणार नाही,” असं जय शाह क्रिकबझशी बोलताना म्हणाले आहेत. भारतात 19 एप्रिल ते 4 जून दरम्यान लोकसभेच्या निवडणूक पार पडणार आहेत. 22 मार्च रोजी चेन्नई येथे एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएलची सुरुवात होईल. आतापर्यंत पहिल्या दोन आठवड्यांत कोणते सामने खेळवले जाणार याबाबचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
आयपीएलचे (IPL 2024) अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी शनिवारी 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे (IPL 2024) यूएईमध्ये हलवली जाईल, ही माहिती फेटाळून लावली आहे. निवडणुकांमुळे आयपीएल (IPL 2024) यूएईमध्ये हलवण्यात येणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.