वाळवा तालुक्यातील हिंस्र प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त!

तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरात कुंडलवाडी, मालेवाडी, बहादूरवाडी, कणेगाव, भरतवाडी यांच्यासह अन्य गाव येत आहेत. या गावांना हिंस्र प्राणी बिबट्या, मगर, तरस, त्याचबरोबर शेतातील पिकांचे नुकसान करणारे रानडुकरे, कोल्ही या प्राण्यांचा त्रास शेतकऱ्यांना व लोकांना होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी तांदूळवाडी येथील जाधव वस्तीला जाणाऱ्या रस्त्यावरील रात्री ९ वाजता बिबट्या आढळला होता. तर आठवड्यापूर्वी कुंडलवाडी येथील वारणा नदीपासून जवळच असणाऱ्या घोडंनपीर बाबा दरग्याजवळच मगरीचा वावर असल्याचे निदर्शनास आले होते.

मालेवाडी व तांदूळवाडी ही गाव मल्लिकार्जुन डोंगरापासून जवळच आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा, मका ही पिके हाताशी आलेली आहे. अशा या पिकावर वानर नुकसान करतात त्यांना हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न केला तर अंगावर येतात. महिला शेतात असेल तर त्यांच्या अंगावर जास्त प्रमाणात येत असतात. या परिस्थितीमुळे शेतकरी चिंतेत आहे. त्याचबरोबर शेतकरी आपल्या शेतात पिकांना पाणी पाजण्यासाठी रात्रीचे वेळी भीत आहे.
दोन वर्षांपूर्वी दोन वेळा पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यादरम्यान नदीमधील मगर व त्यांची पिले ही आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पडून काही शेतकयांच्या शेतातील विहिरीमध्ये तर मोठमोठ्या पाण्याच्या डबक्यात आधार घेऊन आहेत.
वितरण कंपनीकडून शेतीला पाण देण्याचे वेळापत्रक हे चार दिवस रात्रीचे व तीन दिवसपाळी असा विद्युत् पुरवठा केला जात असल्याने पिके जगण्यासाठी रात्रीचे दिवस करण् गरजेचे वाटत असल्याने तर अशाच वेळी हिंस्र प्राण्यांनी दगाफटक केल्यास काय होईल याच भीतीमध्ये शेतकरी आहे. या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.