हृदय पिळवटून टाकणारी घटना! कोल्हापूर जिल्ह्यात भीषण अपघात..

कोल्हापूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सिमेंट काँक्रीटचे मिक्सर मशीन रस्त्याच्या कडेला लावत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने मजुरांना जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात ४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाठार (ता.हातकणंगले) येथील पुलाजवळ रविवारी (ता. १७) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. वाठार (ता. हातकणंगले) येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार, तर सात जण जखमी झाले. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाठार पुलाजवळील सेवा रस्त्यावर सायंकाळी पावणेआठच्या दरम्यान अपघात झाला. टेम्पोला जोडलेले सेंट्रिंगचे मिक्सर मशीन रस्त्याकडेला सोडताना पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली.

मृतांमध्ये तिघे सेंट्रिंग मजूर असून, ते सर्व भादोले (ता. हातकणंगले), तर वाठार येथील एक पादचाऱ्याचा समावेश आहे. जखमींमध्ये वडिलांसह त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. अपघातात सचिन सदाशिव धनवडे (वय ४०), बाबालाल इमाम मुजावर (५०), विकास वड्ड (२६, सर्व रा. भादोले), श्रीकेशव पास्वान (६० रा. वाठार) ठार झाले. सचिन पांडुरंग भाट (३०), कुमार तुकाराम अवघडे (४२), सुनील कांबळे (४०), भास्कर दादू धनवडे (६०, सर्व रा. भादोले), लक्ष्मण मनोहर राठोड (४०), त्यांच्या मुली सविता (१७) आणि ऐश्‍वर्या (१५, तिघे रा. मूळ विजापूर, सध्या भादोले) अशी जखमींची नावे आहेत.