इस्लामपूरमध्ये लस घेऊनही मुलांना ‘गालगुंड’

अलीकडे उन्हाची तीव्रता खूपच वाढलेली आहे. इस्लामपूर ऐन उन्हाळ्यात लहान मुलांत गालगुंड (गालफुगी) मम्प्ससारखा व्हायरस पसरला आहे. ही साथ संसर्गजन्य असल्याने मुलांना सात ते आठ दिवस शाळेत पाठवू नये, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातून दिला जात आहे. लस घेऊनही इस्लामपूर शहर आणि परिसरातील लहान मुलांत गालगुंड या साथीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

यामध्ये कानाखालील ग्रंथींना सूज येते, गालाखाली सूज येते, तापाची लक्षणे दिसतात, कोणताही उपचार नसला तरी लिक्विडसारखे पदार्थ द्यावे लागतात. उन्हाळा आला की मम्प्ससारखा व्हायरस लहान मुलांत पसरतो. लाळींच्या ग्रंथीमध्ये सूज निर्माण होते. लहान मुलांना एमएमआर लस घेण्याची गरज आहे. ज्यांना ही ल दिली गेली आहे त्यांना या रो प्रादुर्भाव होत नाही.

शहरात १ ते १५ वयोगटातील मुलांना याचा प्रादुर्भाव झाला आहे. इतर मुलांना याची लागण होण्याची शक्यता आहे. पालकांनी मुलांची काळजी घेणे आवश्यकता आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पालकांनी उपचार करणे गरजेचे आहे.