विधानसभा निवडणूक अवघ्या महिन्यावर आली असल्याने आचारसंहितेची लगबग देखील सुरू आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीकडून जागा वाटपाच्या चर्चा सध्या सुरू असल्याच्या पाहायला मिळत आहेत. परंतु मात्र अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.
इस्लामपूर मतदारसंघात महाविकास आघाडीतून प्रदेशाध्यक्ष निशिकांत पाटीलच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांची ताकद इस्लामपूर शहरापूर्ती मर्यादित असल्याचे दिसून येते. निशिकांत पाटील हे भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मात्र जागा सेनेकडे राहिल्यास त्यांच्यासाठी विधानसभा गाठण्याची वाट खडतर दिसते.