शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या ” बहुरंगी ढोलकी फडाच्या लोकनाट्य तमाशातील गण, गौळणी, लावण्या, छक्कड, फार्स या रचना नृत्याभिनयासह पाहण्याची संधी सांगलीकरांना उपलब्ध झाली आहे.पारंपरिक तमाशातील कलावंत हे सादरीकरण करणार आहेत.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रविवारी (दि.२४) दुपारी २ वाजता सांगलीत विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यक्रम होईल. सर्वांना मोफत प्रवेश असून, रसिकांनी उपस्थित राहण्याचे संचालनालयातर्फे
आवाहन करण्यात आले आहे.