मराठी चित्रपटात गौतमी पाटील दिसणार थिरकताना…..

सबसे कातिल गौतमी पाटिल या नावाची ओळख महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटिल ही स्टेज डान्सर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चुकीचे हावभाव करून लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात आली होती आता मात्र भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.संजीवकुमार राठोड निर्मीत व दिग्दर्शित द महाराष्ट्र फाईल्स या आगामी मराठी चित्रपटात गौतमी पाटिल थिरकताना दिसणार आहे.

आजपर्यंत महाराष्ट्राने गौतमी ला पारंपारिक वेशभूषेत पाहीले आहे. पण आता या चित्रपटात गौतमी ही एका हिंदी गाण्यावर डान्स बार गर्ल च्या लुक मध्ये दिसणार आहे. महाराष्ट्रामध्ये गौतमी चे करोडो चाहते आहेत. या लुक मध्ये पाहण्याची उत्सुकता तरुण वर्गात मोठ्या प्रमाणावर आहे. गौतमी ला डान्स बार गर्ल च्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक उतावीळ होत आहेत. हा बिग बजेट चित्रपट असून या चित्रपटात मोठी स्टार कास्ट आहे.

द महाराष्ट्र फाईल्स हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात, देशात व जगभरात 850 पेक्षा अधिक चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. पहिल्याच दिवशी 850 चित्रपटगृहात रिलीज होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात संजीवकुमार राठोड हे। लेखक, निर्माते व दिग्दर्शक आहेत. संजीवकुमार राठोड यांनी माजी सेन्सर बोर्ड सदस्य, भारत सरकार मध्ये प्रदिर्घ काळ काम केले आहे.