महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) सांगली लोकसभा (Sangli Loksabha) संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मातोश्रीवरून मला उमेदवारीचा शब्द देण्यात आला आहे, त्यामुळे मी निवडणुकीच्या तयारीत असल्याचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी म्हटले आहे. चंद्रहार पाटील म्हणाले की, मला उमेदवारी मिळाली, तर विशाल पाटील यांनी माझ्या माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे.
विशाल पाटील यांना जरी उमेदवारी जाहीर झाल्यास मी त्यांच्या मागे उभा राहीन, असेही चंद्रहार पाटील यांनी जाहीर केले. आज (21 मार्च) सांगलीमधील मिरजेत उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना चंद्रहार पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आजच्या सभेमधून जे काय चित्र असेल ते स्पष्ट होईल मला उमेदवारी मिळेल, अशी आशा असल्याचे यावेळी चंद्रहार पाटील म्हणाले.