मराठवाडयातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. नांदेड,परभणी हिंगोलीमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे.
आज सकाळी मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. अनेकजण घाबरुन घराबाहेर आले. नांदेडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाची तीव्रत रिश्टर स्केलवर 4.2 अशी नोंद करण्यात आली आहे. अनेक लोक घाबरून रस्त्यावर आले. दरम्यान, यापूर्वी मार्चच्या पहिल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते.