इचलकरंजी शहरात चोरीची गून्हे लवकर उघडकीस आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असताना खोतवाडी येतील रेकॉर्ड वरील गुन्हेगार रफिक मुल्ला याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून साफळा रचून जेरबंद करण्यात आले आणि त्याच्याकडून दोन मोटरसायकल ताब्यात घेण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे प्रयत्न गेले काही दिवस सुरू ठेवले आहेत.
पोलीस अमंलदार बालाजी पाटील व अशोक पोवार यांच्या गोपनीय व्यक्तीकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार रफिक मुल्ला, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर याच्याकडे चोरीची सीबीझेड एक्स्ट्रीम मोटर सायकल आहे आणि तो मोटर सायकल घेवून २० मार्च रोजी सकाळी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ते सरनोबतवाडी जवळील टोल नाक्यावर येणार आहे.
अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या आदेशानुसार सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ व त्यांचे पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी रफिक मुल्ला याला अटक केली आणि त्याच्याजवळ असलेली सीबीझेड मोटरसायल ताब्यात घेतली .त्यानंतर आणखी चौकशी केली असता त्याने यापुर्वी चोरलेली आणखी विना नंबरप्लेटची स्प्लेंडर मोटर सायकल दाखविली. एकूण 1,00,000/- रूपये किंमतीच्या दोन मोटर सायकली पोलिसांनी जप्त केल्या.