भारतीय रेल्वेकडून (Railway) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नियमांत बदल करण्यात येत आहे. कित्येक वर्षांनंतर रेल्वेकडून तिकीट दरात वाढ करण्यात येणार आहे. तोट्यात असल्याचा दावा करत रेल्वेने 1 जुलै 2025 पासून ट्रेन तिकिटांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जुलैपासून एसी आणि नॉन एसी ट्रेनमधील प्रवास महागणार आहे. रेल्वेने मेल आणि एक्स्प्रेससह सगळ्या ट्रेनच्या तिकीटावरील दर वाढवले आहेत. रिपोर्टनुसार, रेल्वेने नॉन एसी कोचचे भाडे प्रति किलोमीटर 1 पैशांने वाढवले आहेत. तर, एसी कोचचे भाडे 2 पैसा प्रति किमीपर्यंत वाढवण्यात आले आहेत. रेल्वे विभागाने हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तुमचा रेल्वे प्रवास 1 जुलैपासून महागणार आहे.
रेल्वेकडून 1 जुलै 2025 पासून ट्रेनच्या तिकीटात वाढ करण्याची तयारी करण्यात आली आहे. रेल्वे बोर्ड 1 जुलैपासून तिकीटांच्या दरात वाढ करू शकतात. अनेक वर्षांनंतर रेल्वेने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं प्रवाशांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. तसंच, महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण आहे. या काळात लाखो प्रवासी मुळ गावी जात असतात. अशावेळी बहुतांश प्रवासी रेल्वेचा पर्याय निवडतात. अशावेळी ऐन गणेशोत्सवात रेल्वेची तिकीट महागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नॉन एसी जनरल मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनचे तिकीटाच्या दरात 1 पैसा प्रति किमी अशी वाढ झाली आहे. तर AC क्लासचे दर 2 पैसे प्रति किमीने वाढणार आहे. म्हणजेच रोज किंवा जवळच प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर या निर्णयाचा परिणाम होणार नाही. 500 किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी तिकीटाच्या दरात वाढ होणार आहे. या निर्णयाच्या अमंलबजावणीसाठी रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. हा नियम लोकल ट्रेनसाठी व महिन्याच्या पाससाठी लागू नसणार. फक्त लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठीच हा नियम आहे.