भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्डकपमधील लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु झाली आहे. टीम इंडियानं नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली आहे. अब्दुल्ला शफीक आणि इमरान उल हक यांनी भारतीय गोलंदाजांना दबाव निर्माण करण्यापासून रोखण्यात यश मिळवलं आहे. पाकिस्तानच्या दोन्ही ओपनर्स बॅटसमननं भारताचा बॉलर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली. मात्र, जसप्रीत बुमराहनं मात्र कमबॅक करत त्याची तिसऱ्या ओव्हरमध्ये एकही रन दिली नाही. यामुळं पाकिस्तानच्या इमरान उल हक वर दबाव निर्माण झाला आहे.
जसप्रीत बुमराहकडून पाकिस्तानी ओपनर्सवर दबाव
भारताच्या बॉलिंगची सुरुवात जसप्रीत बुमराहनं केली. त्यानं पहिल्याच ओव्हरमधील पहिल्या पाच बॉलमध्ये एकही रन दिली नाही. अखेरच्या चेंडूवर त्याला चौकार बसला. तर, जसप्रीत बुमराहनं त्याची दुसऱ्या ओव्हरमध्ये एकच रन दिली. यानंतर बुमराहनं डावाच्या पाचव्या ओव्हरमध्ये म्हणजेच त्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये एकही रन दिली नाही. यामुळं पाकिस्तानच्या इमरान उल हक वर दबाव निर्माण झाला.
सिराजनं मिळवलं पहिलं यश
पाकिस्तानी ओपनर्सनी भारताचा बॉलर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर जोरदार फटेकबाजी केली. सिराजच्या पहिल्या ओव्हरमध्येच पाकिस्ताननं १२ धावा काढल्या. त्यानंतर सिराजनं थोड्या फार प्रमाणात कमबॅक केलं आहे. सिराजनं त्याच्या चौथ्या ओव्हरमध्ये भारताला पहिलं यश मिळवून दिलं आहे. आठव्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर पाकिस्तानचा ओपनर अब्दुल शफीक २० धावा करुन बाद झाला.
रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवला
मोहम्मद सिराजला पहिल्या ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या ओपनर्सनी डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजच्या ओव्हरमध्ये १२ धावा काढल्या होत्या. सिराजनं पहिल्या ३ ओव्हरमध्ये २२ धावा देऊन देखील रोहित शर्मानं आणि विराट कोहलीनं चर्चा करुन मोहम्मद सिराजला बॉलिंगची संधी दिली आणि त्यानं करुन दाखवलं. सिराजनं त्याच्या चौथ्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर पाकिस्तानचा ओपनर अब्दुल शफिक याला बाद करुन भारताला पहिलं यश मिळवून दिलं.