रणधुमाळी आता घुमू लागली आहे. २०२४ ची निवडणूक ही ऐतिहासिक होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाची नावे म्हणजे पवार आणि ठाकरे. या दोन्ही घरांसाठी ही निवडणूक अस्तितवाची लढाई आहे.
एका बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले तर पवारांच्या घराला बंडाची वाळवी लागली. पण हे झाले राज्याचे चित्र, महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात एक शक्तिपीठ हे असतंच.. असंच महाराष्ट्राच्या राजकारणावर काही काळ वर्चस्व असणारं घरं म्हणजे अकलूजचे मोहिते पाटील.महाराष्ट्राच्या राजकारणात अडगळीला गेलेले मोहिते पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात कमबॅक करण्यासाठी धडपड करत आहेत. आणि धडपडीतूनचं माढा लोकसभा निवडणूक आता प्रतिष्ठेची केली आहे.
मोहिते पाटील कोण आहेत, ज्यांची नाराजी भाजपच्या ४५ पार च्या नाऱ्याला सुरुंग लावू शकतो. माढा लोकसभा आणि सोलापूर मतदार संघात भाजपचं राजकारण संपणार का, हे आपण जाणून घेणार आहोत.सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात पसरलेला माढा लोकसभा मतदारसंघ या ना त्या कारणाने सतत चर्चिला जात असतो. अकलूजचे मोहिते पाटील माढा लोकसभेचा खासदार ठरवतात, अशी जनमाणसांची भावना आहे. सुरूवातीला मोहिते पाटलांविषयी थोडक्यात जाणून घेऊ