शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात खासदार राजू शेट्टीचा इशारा…

शक्तिपीठ महामार्ग हा ठेकेदारांच्या भल्यासाठी आहे; प्रसंगी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर, पण हा महामार्ग होऊ देणार नाही,” असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

राज्य सरकारच्या नियोजित शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालयात हा मेळावा झाला.या वेळी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील भाजपचे नेते व माजी आमदार दिनकर पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उदय नारकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.