आम. प्रकाश आवाडे यांचा आरोप विकास कामात अडथळे!

शहरातील प्रत्येक विकासकामात आणि शहराचा पाणी प्रश्न सुटू नये म्हणून अदृष्य शक्ती अडथळा आणत असल्याचा गंभीर आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केला.शहराला पाणी पुरवठा करणारी पंचगंगा नदी प्रदुषीत
झाली असून कृष्णा योजनेला वारंवार गळती लागते. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असल्याने कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलण्यास मंजुरी मिळाली.

हे काम करण्यात अनेक अडचणी येत असल्या तरी मक्तेदार काम करत आहे. मात्र मक्तेदाराला झालेल्या कामाचे देयकही वेळेवर मिळत नाही. दोनवेळा महापालिकेने दिलेला धनादेशही परत आलाय. त्यामुळे मक्तेदाराला जलवाहिनीआम. प्रकाश आवाडे यांचा आरोप देण्याऱ्या कंपनीकडून जलवाहिनीही मिळत नाही. त्यासाठी कंपनीकडून महापालिकेच्या बँक गॅरंटीची मागणी होत आहे. जलवाहिनी बदलण्यासाठी ७ कोटी ८८ लाख रुपये शासनाकडून मिळाले असले तरी महापालिका बँक गॅरंटीही देण्यास तयार नाही.पाणी उपसा करण्यासाठी जॅके वलमध्ये सद्या ५४० अश्वशक्तीचे २ पंप असून ते बदलून ७५० अश्वशक्तीचे २ पंप बसवण्यास मंजुरी मिळाली आहे.

मात्र जॅकवेल जुने असल्याने स्ट्रक्चरल ऑडीट करावे लागणार आहे. त्यासाठीही प्रशासन उदासिन आहे. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कृष्णेची जलवाहिनी बदलण्याच्या कामाला गती देऊन कुरूंदवाड ते मजरेवाडी आणि इचलकरंजीत अशा दोन्हीकडून काम करणे गरजेचे असले तरी हे काम रखडवले जात आहे. एकुणच पाणी प्रश्न प्राधान्याने सोडवला नाही तर शहराचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर बनणार आहे. तरीही मोठी अदृष्य शक्ती शहराचा पाणी प्रश्न सुटूच नये म्हणून प्रयत्नशिल असल्याचा आरोप आमदार आवाडे यांनी केला. लोकसभा उमेदवारीबाबत त्यांना छेडले असता नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुती जो उमेदवार देईल त्याला निवडूण आणण्यासाठी झटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.