प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राम सातपुते मैदानात……

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश आहे.सोलापुरात राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलं आहे.या जागेवर सध्या भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी खासदार आहेत. जयसिद्धेश्वर स्वामींचं यावेळी तिकीट कापलं गेलं आहे.

राम सातपुतेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.तर गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशोक नेते यांना भाजपकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपकडून याआधी 20 उमेदवार जाहीर करण्यात आले होते.

त्यानंतर तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.त्यामुळे भाजप महाराष्ट्रात 48 पैकी 23 जागांवर लढणार असल्याचं निश्चित झालं आहे. महायुतीचं जागावाटपावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक पार पडल्यानंतर भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.