नवरात्री उत्सवाची उपासना कशी करावी ते जाणून घ्या

आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्री उत्सव प्रारंभ होतो. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, याला नवरात्र उत्सव असे म्हणतात. शारदीय नवरात्रीचा हा उत्सव १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. नवरात्रीच्या या दिवसांत दुर्गा देवीची विशेष पूजा केली जाते. या दिवसात अनेक शुभ कार्य देखील केले जातात. जर तुम्ही देखील नवरात्रीचा उपवास करत असाल किंवा घटस्थापना करत असाल तर या पद्धतीने पूजा करा.

1. शारदीय नवरात्र तिथी मुहूर्त

  • प्रतिपदा तिथी प्रारंभ – 14 ऑक्टोबर 2023, शनिवारी रात्री 11:24 वाजता
  • प्रतिपदा तिथीची समाप्ती – 15 ऑक्टोबर रविवार, रात्री 12:32 वाजता
  • उदयतीनुसार, शारदीय नवरात्र रविवार 15 ऑक्टोबरपासून सुरू होईल. या दिवशी कलश प्रतिष्ठापनही करण्यात येणार आहे.

2. कलश स्थापनेची शुभ वेळ:

  • 15 ऑक्टोबर सकाळी 11:44 ते दुपारी 12:30 पर्यंत.
  • कलश स्थापनेचा एकूण कालावधी: 45 मिनिटे.

3. कलश स्थापना पूजा पद्धत

  • नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत.
  • पाट किंवा चौरंगवर स्वस्तिक चिन्ह बनवा.
  • त्यानंतर चंदन आणि अक्षता यांनी तिलक लावून तेथे मातेची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावे.
  • यानंतर विधीनुसार दूर्गादेवीची पूजा करावी.
  • कलश स्थापना करताना उत्तर आणि ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात लावावा.
  • कलशाच्या तोंडाभोवती अशोकाची पाने लावा, नारळाभोवती चुणरी बांधा.
  • सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।। या मंत्राचा (Mantra) उच्चार करा