पैशांसाठी पती झाला हैवान; पत्नीचं डोकं जमिनीवर आपटून हत्या

रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. आपल्या रागावर नियंत्रण नसल्यास अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तींना गमावून बसतात. वर्धा येथून अशीच एक घटना समोर आली आहे. पतीने रागाच्याभरात आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केलीये. पोलीस या प्रकरणी अधिक तापस करत आहेत. 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुलगाव पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलीये. मंगला राजेश राजगत्ता (४५ रा. दखनी फैल, पुलगाव) असं मृत महिलेचं नाव आहे. तर राजेशसिंग राजदत्ता (५५) असं आरोपी पतीच नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

हत्येमागचं कारण काय?

पती आणि पत्नीमध्ये काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. काल मजुरीच्या पैशांच्या कारणातून त्यांच्यात परत एकदा वाद झाला. त्यानंतर संतप्त पतीने पत्नीचं डोकं जमिनीवर ठेचून तिची हत्या केली.

पत्नीने पैसे न दिल्याने पतीचा संताप फार वाढला होता. रागाच्या भरात तो पत्नीचं डोकं जमिनीवर आपटत राहिला. यातच महिलेचा मृत्यू झालाय. राहुल रामदास चांनपुरकर (४३) याने पुलगाव पोलिसांत घटनेबाबत तक्रार दाखल केली होती.

पुलगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांनी घटनेची दखल घेतलीये. पोलिसांनी आरोपी राजेशसिंग दखनी फैल परिसरातून अटक करत बेड्या ठोकल्यात. या प्रकरणी पोलीस गावात चौकशी करून तपास करत आहेत.