Thalaivar 171’रजनीकांत यांचा फर्स्ट लूक आऊट

साउथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या त्यांचा आगामी ‘थलायवर 170’ (Thalaivar 170) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ३३ वर्षांनंतर रजनीकांत आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसणार आहेत.

‘मास्टर’, ‘विक्रम’ आणि ‘लिओ’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे निर्माते लोकेश कनागराज हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. रजनीकांत यांचे चाहते त्यांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटातील रजनीकांत यांचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे स्टायलिश अंदाजमध्ये रजनीकांत दिसत आहेत.

मागच्या वर्षी रजनीकांत यांनी ‘जेलर’ हा सुपरहिट चित्रपट दिला होता. त्याच वर्षी ‘लाल सलाम’ या चित्रपटातही ते दिसले होते. आता ते दिग्गज दिग्दर्शक लोकेश कनागराजसोबत त्याचा आगामी चित्रपट ‘थलायवर 171’ च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लोकेश कनागराज आणि रजनीकांत यांनी मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये ‘थलायवर 171’ ची घोषणा केली होती. नुकताच लोकेशने या चित्रपटाशी संबंधित एक मोठे अपडेट शेअर केले आहे. त्याने या चित्रपटातील रजनीकांत याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. रजनीकांत यांना स्टायलिश अंदाजमध्ये पाहून चाहते खूश झाले आहेत.