वाळवा तालुक्यातील ताकारी येथे गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या 26 वर्षीय युवकाला जेरबंद करत सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्यांच्याकडून सुमारे दोन लाख 18 हजार रुपयांचा गांजा जप्त केलेला आहे. हा गांजा त्याने कराड येथील एकाकडून आणल्याची कबुली दिली आहे.
येथील न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अमोल सूर्यकांत भोसले वय 26 राहणार शिवनगर रेटरे बुद्रुक असे संशयिताचे नाव आहे. तर गांजा देणाऱ्या विराज पाटील राहणार कल्याणी इंग्लिश स्कूल कॅम्पस कराड याचा पोलीस शोध घेत आहेत.