लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून यावेत, यासाठी उद्धव ठाकरे ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत.
पुढील काही दिवस राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा प्लान उद्धव ठाकरेंनी आखला आहे.येत्या २ मे रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोल्हापुरात जंगी सभा घेणार आहेत.
कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्याच्या विजयासाठी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात सभा घेण्याचं ठरवलं आहे. अर्थातच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत.