सांगोला, वादळी वारे व पावसाने सांगोला (Sangola) तालुक्यात शेतीसह घराचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने शेतीतील कामे खोळंबली -असून घराच्या नुकसानीने नागरिक हवालदिल झाले आहेत. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आलेगाव येथे पावसामुळे सिद्धेश्वर गणपत बाबर यांचे राहते माळवद घर पडून नुकसान झाले आहे. तर सुखदेव ज्ञानू बाबर यांचे राहते माळवद घराची भिंत पडून नुकसान झाले आहे. तसेच सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हंगरगे येथील काळेवाडीत बाळू गणपती गावडे यांच्या राहत्या घरावरील पत्रे वादळ वारे व पावसात उडून गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने व वादळी वाऱ्याने यंदा घराचे, पिकांचे व वीज पडून जनावरे दगावण्याच्या घटनामुळे बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे.
सांगोला मध्ये वादळी वाऱ्याने दोन घरांचे नुकसान
