LPG सिलेंडर होणार स्वस्त……

उद्या 1 एप्रिल आहे. हा दिवस जगात एप्रिल फूल नावाने पण ओळखल्या जातो. तर 1 तारखेला अनेक बदल होतात. पेट्रोल-डिझेलपासून ते गॅस सिलेंडरपर्यंत अनेक वस्तूंचे भाव बदलतात. यावेळी तर 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षे सुरु होत आहे. त्यात उद्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळू शकतो. गेल्या काही वर्षांत गॅस सिलेंडरच्या किंमती तिप्पटीवर पोहचल्या. 400 रुपयांना मिळणार गॅस थेट 1100 रुपयांच्या घरात पोहचला होता. गेल्या सहा महिन्यात त्यात दोनदा कपात झाली. 14.2 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत सध्या 930 रुपयांच्या आत आहे.

त्यात अजून कपातीचे संकेत मिळत आहेत.मार्च महिन्यात जागतिक महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना गिफ्ट दिले. नारी शक्तीला नमन करत त्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांची कपाताची घोषणा केली. 1 मार्च रोजी सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या किंमतीत वाढ केली. पण घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल केला नव्हता. 8 मार्च रोजी सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी झाली.केंद्र सरकारने गेल्या वर्षी 29 ऑगस्ट 2023 रोजी मोठी घोषणा केली होती.

त्यावेळी घरगुती गॅस सिलेंडरचे दर 200 रुपयांनी कमी करण्यात आले. तर उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना 200 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जून 2023 मध्ये गॅस सिलेंडर 1100 रुपयांवर पोहचल्या होत्या. गेल्या सात महिन्यांपासून 14.2 किलोच्या सिलेंडरचा भाव 902.50 रुपये होता. मार्च महिन्यातील 100 रुपयांच्या कपातीनंतर गॅस सिलेंडरचा भाव आता 802.50 रुपयांवर आला आहे.