अभिनेत्री जान्हवी कपूर कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून जान्हवी उद्योजक शिखर पहाडिया याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये जान्हवी हिने शिखर याच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठा खुलासा केला होता. शिखर आणि जान्हवी एमेकांना डेट करत आहेत.
एवढंच नाहीतर, कपूर कुटुंबियांसोबत देखील शिखर याला अनेकदा स्पॉट करण्यात आलं. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी लेकीच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. मुलाखतीत जान्हवी आणि शिखर एकत्र असल्याचा खुलासा बोनी कपूर यांनी केला आहे.
बोनी कपूर म्हणाले, शिखर मला प्रचंड आवडतो. तो जेव्हा जान्हवीसोबत नव्हता तेव्हापासून मी त्याला ओळखत आहे. मी आणि शिखर मित्र आहोत. पण आता काही वर्षांपासून शिखर – जान्हवी एकत्र आहेत. जेव्हा जान्हवी आणि शिखर रिलेशनशिपमध्ये आले, तेव्हा माला खात्री होती की शिखर कधीच जान्हवीचा एक्स-बॉयफ्रेंड होऊ शकत नाही. मला माहिती होतं दोघे कायम एकत्र राहतील. शिखर कधीच जान्हवीला सोडून जाणार नाही. दोघांमध्ये वाद झाले तरी, शिखर पुन्हा जान्हवीकडेच येईल. मला माहिती दोघांचं नातं आयुष्यभरासाठी आहे.
‘जान्हवी – शिखर यांच्यामध्ये मैत्री आहे… प्रेम तर दोघांमध्ये प्रचंड आहे… माझ्यासाठी शिखर कायम कोणत्याही प्रसंगी धावत येतो… जान्हवी, खुशी, अर्जुन, अंशुला यांच्यासोबत शिखरचे चांगले संबंध आहेत… सगळ्यांना शिखर आवडतो. जेव्हा पापाराझींसमोर पोज देण्याची वेळ येते तेव्हा शिखरला आवडत नाही…’ असं देखील बोनी कपूर म्हणाले.