महाराष्ट्र कर्नाटक मधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापुर ता. भुदरगड येथील सद्गुरु बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेस हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला.
शनिवार दि.30 पासुन ही भंडारा यात्रा सुरू झाली.7 एप्रिल पर्यंत ही यात्रा होणार आहे. रंगपंचमी दिवशी समाधीपुजन, अभिषेक व देवालय समितीचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांचे चिरंजीव कर्ण सिंह भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. भंडारा यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर व कळसावर आणि भक्तनिवास येथे नेत्रदिपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहिल्या दिवसापासूनच नवरात्र उपवास करणारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.प्रशासकिय समिती सदस्य रागीणी खडके,ग्रामस्थ, भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होता.
बाळूमामा भंडारा यात्रेस प्रारंभ!
