लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 11 जणांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीने आधीच आठ उमेदवारांची घोषणा केली होती, त्यामुळे आता वंचितचे एकूण 19 उमेदवार झाले आहेत.वंचित बहुजन आघाडीने आणखी उमेदवार घोषित केल्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांचा पक्ष महाविकासआघाडीत सहभागी होणार का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीकडून मात्र प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करू, ते महाविकासआघाडीत सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत सोलापूर, माढा, हिंगोली, मुंबई उत्तर मध्य यासह 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार
हिंगोली- डॉ. बी.डी. चव्हाण, लातूर- नरसिंगराव उदगीरकर, सोलापूर- राहुल गायकवाड, माढा- रमेश बारसकर, सातारा- मारुती जानकर, धुळे- अब्दुर रहमान, हातकणंगले- दादागौडा पाटील, रावेर- संजय पंडीत ब्राह्मणे, जालना- प्रभाकर बकले, मुंबई उत्तर मध्य- अबुल हसन खान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग- काका जोशी