RBI चा नवा नियम! बँकेला ग्राहकांना दररोज द्यावे लागणार 5000 रुपये, कारण…

एखादी बँक किंवा कर्ज देणारी संस्था तुम्हाला दररोज 5000 रुपये दंड म्हणून देते जरा, असा विचार करून पाहा. हो तुम्ही हे बरोबर वाचत आहात. दंड घेत नाही तर देत आहे. कारण साधारणपणे बँका आपल्याकडून दंड घेतात. पण RBI चा नवा नियम आला आहे. 1 डिसेंबर 2023 पासून हा नियम लागू होईल. बँक आणि एनबीएफसीने (NDFC) एका दिवसाचाही उशीर केल्यास त्यांना दररोज 5000 रुपये ग्राहकांना द्यावे लागतील. हे मालमत्तेची कागदपत्र ते मालमत्ता गहाण ठेवण्यास होणारा विलंब यासंबंधित आहे. 

गृहकर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज घेताना, मालमत्तेची कागदपत्र कर्जासाठी गहाण म्हणून बँक किंवा गैर-वित्तीय बँकेकडे जमा करावी लागतात. अनेक वेळा लोक स्थायिक किंवा अस्थायिक मालमत्ता गहाण ठेवतात. कर्जाची परतपेड केल्यानंतर, बँका किंवा बिगर-वित्तीय बँका तुमच्या मालमत्तेची कागदपत्रे परत करण्यास सतत विलंब करतात जे तुम्ही बँकेत जमा केले होते.

सध्या अशा तक्रारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे रिझर्व्ह बँकेने 13 सप्टेंबर रोजी एका अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले की, स्थायिक किंवा अस्थायिक मालमत्तेची कागदपत्रे कर्ज देणाऱ्या संस्थांना बँकेच्या कर्जाची परतफेड केल्याच्या 30 दिवसांच्या आत परत करावीत. असे न केल्यास बँकांना, ग्राहकाला प्रत्येक 1 दिवसाच्या विलंबासाठी 5000 रुपये दंड द्यावा लागेल.

एवढंच नाही तर, संपत्तीची कागदपत्रे गहाण ठेवून दिलेल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर, कागदपत्रे परत करण्याची कालमर्यादा आणि ठिकाण हे कर्ज मंजुरीच्या पत्रातच स्पष्ट नमूद करावे, असे सेंट्रल बँकेने म्हटले आहे.

आरबीआयच्या निर्देशानुसार, बँक किंवा NBFC सर्व ओरिजनल स्थायिक/ अस्थायिक मालमत्तेची कागदपत्रे जारी करतील आणि कर्ज खात्याची पूर्ण परतफेड/ सेटलमेंट झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत कोणत्याही नोंदणीमध्ये नोंदणीकृत शुल्क काढून टाकतील.

कर्जदाराला त्याच्या प्राथमिकतेनुसार, स्थायिक/ अस्थायिक मालमत्तेची कागदपत्रे एकतर बँकिंग आउटलेट/शाखेतून जिथे कर्ज खाते चालवले गेले होते किंवा त्यांच्या इतर कोणत्याही कार्यालयातून गोळा करण्याचा पर्याय दिला जाईल जिथे कागदपत्रे उपलब्ध असतील.

ओरिजनल स्थायिक/ अस्थायिक मालमत्तेची कागदपत्रे परत करण्याची अंतिम मुदत आणि ठिकाण कर्ज मंजुरी पत्रात नमूद केले जाईल.

कर्जदार एकटा असो किंवा संयुक्त कर्जदार असो. नैसर्गिक मृत्यू किंवा अपघाती घटनेमुळे मृत्यू झाल्यास ओरिजनल स्थायिक/ अस्थायिक मालमत्तेची कागदपत्रे कायदेशीर वारसांना परत करण्याची प्रक्रिया निश्चित केली जाईल. याची संपूर्ण प्रक्रिया वेबसाइटवर आहे.

ओरिजनल स्थायिक किंवा अस्थायिक मालमत्तेचे दस्तऐवजांचे नुकसान किंवा गहाळ झाल्यास, अंशतः किंवा पूर्णपणे, बँक किंवा NBFC कागदपत्रांच्या डुप्लिकेट किंवा प्रमाणित प्रती मिळविण्यासाठी कर्जदाराला मदत करतील. यामध्ये होणारा खर्चही बँकानाच उचलावा लागेल. तसंच, अशा प्रकरणांमध्ये, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नियमन केलेल्या संस्थांना 30 दिवसांचा अतिरिक्त वेळ उपलब्ध असेल.