गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे अनेक प्रकार उघड होत आहेत. पोलिसांनाही अनेकदा चक्रावून सोडले आहे. असा प्रकार पाटणा पोलिसांबाबतीत घडला आहे. गुरुवारी रात्री उशिरा पाटणा येथील शास्त्रीनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. पाटणा येथील एक प्रेमप्रकरणात सद्दाम हुसेन उर्फ निशू खान याला गोळ्या घालून जखमी करण्यात आले आहे. याप्रकरणी घटनास्थळावरून पकडलेल्या तरुणीने पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
मैत्रीणीने आखाला प्लॅन
निशूच्या हत्येनंतर त्याची मैत्रीण जागृती सिंग तिचा नवीन प्रियकर मिसाल सिंगसोबत पार्टी करण्यासाठी ती गोव्याला जाणार होती. मात्र त्याआधीच शास्त्रीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी धर्मेंद्र कुमार आणि त्यांच्या टीमने जागृतीला सिंगला ताब्यात घेतले.. त्यावेळी त्या तरुणीने अनेक धक्कादायक गुपिते उघड केली. त्यानंतर निशू खानवर गोळ्या झाडणाऱ्या मिसाळ या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली.
डोळ्यासमोर हवी हत्या
पोलिसांनी सांगितले की, ज्या मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे, तिला तिचा मित्र मिसाळ गोव्याला घेऊन जाण्यासाठी इच्छूक होता. मात्र गोव्याला पार्टी करण्यासाठी आधी निशू खानची हत्या करण्याची तिने त्याला अट घातली होती. त्याचीच पार्टी करण्यासाठी ती दोघं गोव्याला जाणार होती. जागृती एवढ्यावरच थांबली नाही तर तिला तिचा एक्स बॉयफ्रेंड निशू खानचा तिच्या डोळ्यासमोर त्याची हत्या झालेली तिला बघायची होती. त्यासाठी ती गुरुवारी संध्याकाळपासून फ्लॅटमध्ये तिच्या मैत्रिणी आणि प्रियकर मिसाळसोबत पार्टी करत असताना त्या निशू खानची ती माहिती घेत होती.
कार थांबवून हल्ला
निशू खानवर गोळ्या झाडण्यासाठी त्याच्या गाडीचा मिसाळने चार किलो मीटरपर्यंत त्याचा पाठलाग केला. मात्र त्याला योग्य वेळ साधता आली नाही. त्यासाठी जागृती सिंगने एक प्लॅन आखला. निशू खानची कार समनपुरी वळणावर तिने थांबवली होती. त्याचवेळी दबा धरुन बसलेल्या मिसाळने दुसऱ्या कारमधून उतर निशू खानवर गोळ्या झाडल्या. निशू खानवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या मात्र त्यातील तिसरी गोळी ही त्याच्या मनक्यामध्ये लागली आणि तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला.
पोलिसांना बसला धक्का
निशू खानवर हल्ला झाल्याचे कळताच त्याला काही नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. शस्त्रक्रिया करुन निशू खानचा जीव वाचवण्यात आल्यानंतर जागृती सिंगला पोलिसांनी ताब्यात घेत तिच्याकडून या हल्ल्याची माहिती घेण्यात आली. त्यावेळी तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यावेळी पोलिसांनाही तिच्या प्लॅनमुळे धक्का बसला. या हल्ल्याची चौकशी सीसीटीव्हीच्या आधारे केली जात आहे.