इलेक्शन ड्यूटीवर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे. ड्यूटी करताना अपघात झाला किंवा हार्ट अटॅक आला किंवा इतर कोणताही आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर कॅशलेस सुविधाअंतर्गत उपचार करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सोलापुरातील पंचवीस हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निहाळे यांनी दिली.सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. उन्हाळा सुरू असल्याने चाळीस ते पंचेचाळीस वयापुढील कर्मचाऱ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मतदान केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओआरएस ज्यूस देण्यात येणार आहे.यासोबत मतदारांसाठी मतदान केंद्रावर प्राथमिक उपचार पथक तैनात करण्यात येणार आहे, तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघातील १९०० मतदान केंद्रांत तात्पुरत्या पाळणा घरांची सुविधा देण्यात येणार आहे.
यासोबत मतदारांसाठी मतदान केंद्रावर प्राथमिक उपचार पथक तैनात करण्यात येणार आहे, तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघातील १९०० मतदान केंद्रांत तात्पुरत्या पाळणा घरांची सुविधा देण्यात येणार आहे.
मतदान केंद्रांवर मतदान करायला आलेल्या महिलांना त्यांच्याकडील पाच वर्षांखालील मुलांना काही वेळ पाळणा घरात ठेवता येणार आहे. पाळणा घरात लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणी व मनोरंजन साहित्य असणार आहेत.मतदान केंद्रांवर येणाऱ्या महिलांची अडचण होऊ नये. घरी लहान मुले असल्यावर मतदान करायला महिला बाहेर पडत नाहीत, अशा महिलांसाठी मतदान केंद्रांवर तात्पुरत्या पाळणा घराची सुविधा देण्यात येणार आहे.
यात महिला कर्मचारी पाळणा घरात येणाऱ्या मुलांची काळजी घेणार आहेत. सांभाळ करणार आहेत.तसेच उन्हाळा असल्याने लांबून येणाऱ्या मतदारांची काळजी घेण्यासाठी मतदान केंद्राजवळ आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे संपर्क नंबर मतदान केंद्रात लावले जाणार आहे