सांगली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाकडून युद्धपातळीवर पूर्ण केली जात असून,निवडणूक कामात हलगर्जीपणा होणार नाही याची पुरेपूर काळजी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घेतली जात आहे. निवडणूक कामासाठी जिल्ह्यात ११४२ वाहने लागण्याची शक्यता आहे. त्यासाठीची तयारी जवळपास पूर्ण करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात वाहनांची मोठ्या प्रमाणात गरज असते. इव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट यांच्या वाहतुकीसाठी कंटेनर किंवा बंदिस्त बॉडी असलेल्या वाहनांचा वापर केला जातो. सहा कंटेनर लागणार आहेत. यासोबतच निवडणूक कर्मचारी, अधिकारी व निरीक्षकांसाठी कार, जीपसारख्या वाहनांचा वापर केला जाणार आहे. निवडणूकीसाठी विविध वाहनांच्या नियोजनावर भर दिला जात आहे.
वाहनांच्या नियोजनासाठी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा आधार घेतला गेला, परंतु विधानसभा मतदारसंघाकडून वाहनांच्या नियोजनासाठी जिल्हा निवडणूक विभागाने आराखडा मागविला होता. त्या आधारावर वाहनांचे नियोजन केले आहे. मतदान केंद्र वाढलेल्या ठिकाणी वाहनांची संख्या वाढते. मागच्या निवडणुकीपेक्षा विधानसभा मतदारसंघाकडून आलेल्या आराखड्यानुसार वाहनांचे नियोजन केले जात आहे.