सोलापुरात विमानतळ अन् आयटी पार्क उभारणार…..

पंतप्रधान मोदीजीजवळ जाऊन बसेन पण विमानतळ सुरु करेन हा माझा शब्द आहे, असं म्हणत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे (Solapur Lok Sabha Constituency) भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी सोलापूरकरांना शब्द दिला आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार आणि सभांचा धडाका सुरु झालेला पाहायला मिळत आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहे. अशात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टीकेला राम सातपुते यांनी उत्तर दिलं आहे.पुढील पाच वर्षात सोलापूरला 25 वर्षे पुढे नेईल हा शब्द देतो. विमानतळ सुरू झाल्यानंतर सोलापूरकरांसाठी उत्तम प्रकारचं आयटी पार्क उभा करणार, असं राम सातपुते यांनी म्हटलं आहे, अशी घोषणा भाजप उमेदवार राम सातपुते यांनी केली आहे.

ते सोलापुरातील प्रचारादरम्यान बोलत होते.ऑगस्ट महिन्यात सोलापुरातून विमानतळ सुरु होईल. त्यासाठी मी मोदीजींजवळ जाऊन बसेन पण विमानतळ सुरु करेन हा माझा शब्द आहे. सोलापुरातील एमआयडीसी पुन्हा नव्या जोमाने उभा करेन. चादर आणि टॉवेल उद्योगासाठी टेक्स्टाईल पार्क उभं करणार, सोलापुरातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंसाठी वर्ल्ड क्लास एक्जीबिशन सेंटर उभारणार, मी काम करणारा कार्यकर्ता आहे. विरोधकांनी कितीही टीका केल्या तरी, मी त्यांना बोलणार नाही. असेही ते म्हणाले.