कॉम्प्युटर कोर्स करण्याचा विचार करताय तर मग करा ‘हे’ कोर्स करिअर होईल सेट!

आजकाल संगणकाचे ज्ञान खूपच महत्वाचे आहे. आजचे युग संगणक युग आहे. घरापासून कार्यालयापर्यंत सर्व कामे कॉम्प्युटरच्या माध्यमातून होत आहेत. अशा स्थितीत संगणक क्षेत्रातील करिअरबाबत बोलायचं झालं तर मग ती सरकारी नोकरी असो वा खासगी, संगणकाचे ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण कॉम्प्युटर कोर्सबद्दल बोललो, तर चांगल्या नोकरीबरोबरच पगारही उत्तम आहे.

VFX आणि अॅनिमेशन कोर्स : आजच्या काळात अॅनिमेशन व्यावसायिक आणि कलाकारांना खूप मागणी आहे. आजकाल चित्रपटही अॅनिमेशन बनवले जात आहेत. जिथं चित्रपट उद्योगात अॅनिमेशन आर्टिस्ट आणि व्यावसायिकांना खूप मागणी आहे. या कोर्सनंतर एखाद्याला सहजपणे फिल्म इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळू शकते. याचा शॉर्ट टर्म कोर्स 5 महिन्यांचा आहे तर डिप्लोमा 3 वर्षांचा आहे.

वेब डिझायनिंग : हा नोकरीच्या दृष्टीने सर्वोत्तम कोर्स मानला जातो. हे केल्यानंतर, तुम्हाला बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट ऑफर मिळू शकतात. बाजारात वेब डिझायनर्सना खूप मागणी आहे. या कोर्समध्ये JavaScript, PHP, HTML इत्यादी कोडिंग भाषांचा अभ्यास समाविष्ट आहे. 6 महिन्यांचा हा कोर्स केल्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःचं काम सुरू करू शकता किंवा तुम्ही कोणत्याही कंपनीतही काम करू शकता.

टॅली कोर्स : टॅली तज्ज्ञांच्या मागणीमुळे टॅली कोर्सला देखील खूप मागणी आहे. हे अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. कोणत्याही संस्थेतून शिकण्याव्यतिरिक्त, तुम्ही ते ऑनलाइन देखील शिकू शकता. हे अकाउंट्स आणि अकाउंटिंगबद्दल सांगते. या कोर्सचा कालावधी 3 ते 4 महिने आहे.

कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा : यामध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स आणि प्रोग्रामिंग यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अनेक नामांकित महाविद्यालयं आणि संस्था हा संगणक विज्ञान अभ्यासक्रम देतात. हे केल्यानंतर करिअरच्या अफाट शक्यता आहेत आणि तुम्हाला नोकरीचं चांगलं पॅकेजही मिळू शकते.

IT मधील डिप्लोमा : IT मध्ये डिप्लोमा हा बारावीनंतरचा सर्वोत्तम संगणक अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम उपयुक्त आणि मौल्यवान असून त्याचा कालावधीही मोठा आहे. तुमचं करिअर योग्य दिशेनं घेऊन तुम्ही संगणक क्षेत्रात मास्टर बनू शकता. या कोर्सचा कालावधी 3 वर्षे आहे.