कृष्णा पाईपलाईनचे काम पुन्हा रखडले…..

इचलकरंजी शहराला पाण्याची तीव्र टंचाईला सामोरे जावे लागते. अशातच सतत लागणाऱ्या गळतीमुळे देखील अपुरा पाणीपुरवठा करण्यात येतो. अश्यातच इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्ण नळपाणी योजनेची नवीन वितरणनलिका टाकण्याचे काम शहरातील महासत्ता चौक रिंगरोडवर सुरू आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून सदरचे काम ठप्प आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

काम बंद ठेवायचे असेल तर रस्त्याची खुदाई का केली ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात ५.५ कि.मी. मिटरची वितरणनलिका बदलण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी तब्बल २१ कोटी रुपये – मंजूर झाले आहेत. सदरचे काम मुंबई येथील अॅलीकॉन एजन्स सोल्युशन प्रा. लि. सह जे. वी. एम.डी. इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी कंपन्यांना मिळाले आहे. सदर कंपनीकडून कासवगतीने काम सुरू असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सदर मक्तेदाराला दिलेल्या कामाची मुदतही संपली आहे. तेव्हा कामचुकार करणाऱ्या मक्तेदारावर महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत