मोठी बातमी! विशाल पाटील यांना…….

महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरुन मोठी ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानंतरही  सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेस पक्ष अजूनही ठाम आहे.  

मात्र विशाल पाटील यांना लोकसभेऐवजी राज्यसभेवर पाठवण्याच्या पर्यायावर सध्याा मविआचे नेते (Maha Vikas Aghadi)  विचार करत असल्याचं  माहिती समोर आली आहे.  विशाल पाटील यांना राज्यसभेवर पाठवल्याने विशाल पाटील आणि काँग्रेस नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांची यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडीकडून पर्याय  काँग्रेस पक्षाला देण्यात आल्याची माहिती आहे.  

सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पक्षाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.   विशाल पाटील यांचा यामध्ये विशेष विचार करून त्यांचं राजकीय पुनर्वसन  कशाप्रकारे करता येईल यासाठी यासाठी महाविकास आघाडीने हा पर्याय काढला आहे.

राज्यसभेव्यतिरिक्त दुसरा पर्याय देखील विचाराधीन आहे, आणि तो म्हणजे विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना पूर्ण पाठिंबा दिला जाईल.. यावर अंतिम निर्णय काय होतो ते पाहायचं.