‘या’ राज्यात सरकारी कार्यालयांमध्ये चक्क जीन्स- टीशर्टवर बंदी!

राजस्थानच्या सरकारी कार्यालयांमध्ये जेवणाच्या टेबलांचा मेन्यू बदलल्यानंतर आता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या ड्रेसबाबतही नव्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जीन्स आणि टी-शर्ट घालता येणार नाही. मुख्य सचिव सुधांश पंत यांच्या सूचनेनंतर सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत. आता सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सन्माननीय वेशात कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.