खानापूर, आटपाडी दोन्ही तालुके दुर्लक्षित!

सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी हे तालुके पूर्वी पंढरपूर लोकसभा मतदारसंघात होते. पंढरपूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव होता. या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा पंढरपूर व सांगली जिल्ह्यातील खानापूर व आटपाडी या तालुक्यांचा समावेश होता. सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे या मतदारसंघावर कायम सोलापूर जिल्ह्याचे वर्चस्व राहिले.

ढरपूर लोकसभा मतदारसंघात असताना दुर्लक्षित असणाऱ्या खानापूर आटपाडी तालुक्याचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. सांगली लोकसभा मतदारसंघात आल्यानंतर या तालुक्यांचे रस्त्याचे प्रश्न सुटले असले तरी टेंभूच्या पाण्याचे योग्य नियोजन, द्राक्ष व डाळिंबावर आधारित उद्योग व्यवसाय निर्माण करण्यात लोकप्रतिनिधींना अजून यश आले नाही. २००९च्या मतदारसंघ पुनर्रचनेत पंढरपूर लोकसभा मतदारसंघ रद्द होऊन खानापूर, आटपाडीचा समावेश सांगली लोकसभा मतदारसंघात करण्यात आला.