आटपाडी शहरात दि. २४ रोजी होणार गौरव सोहळा, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी गावाचे सुपुत्र असणारे गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदार संघातून विजयी झाले आहेत. घरामध्ये कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी मिळवलेले यश हे तमाम आटपाडी तालुक्यातील नागरिकांचे मान उंचावणारे आहे. त्यांनी आपल्या आक्रमक भाषण शैलीने त्यांनी संपूर्ण जनमानसात आपली छाप उमटविली आहे.

आटपाडी तालुक्याचे सुपुत्र, जत विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सन्मानासाठी आटपाडीनगरी सज्ज झाली आहे. शहरात मुख्य रस्त्यावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून, संपूर्ण शहरभर फ्लेक्स लावण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती झाली आहे.खानापूर-आटपाडी त्यांचा मतदार संघ असताना भाजपने त्यांना जत विधानसभेचे तिकीट दिले.

याठिकाणी त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास सार्थ ठरविला. त्यांच्या या विजयामुळे आटपाडी शहरात दिनांक २४ रोजी त्यांचा मोठा सन्मान करण्यात येणार असून या गौरव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी केले आहे.